अहमदनगर उत्तर

विखेंच्या सूचनेनंतरही नगरसेवकांची सर्वसाधारण सभेला पाठ… राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  राहाता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेवकांचा कार्यकाल येत्या 28 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.

त्यामुळे अवघे 6 दिवस कार्यकाळ शिल्लक राहिल्याने गुरुवारी होणारी विशेष सर्वसाधारण सभा सर्व नगरसेवकांच्या कार्यकाळातली शेवटची सभा होती; परंतु भाजपचे नगरसेवक गुरुवारी होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेला गैरहजर राहण्याची भूमिका घेतल्याने आ. विखे पाटील भाजप नगरसेवकांनी बाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज होणार्‍या राहाता नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दबाव येऊ नये व सभेतील विषयामुळे गावात वाद निर्माण होऊ नये याकरिता भाजप नगरसेवकांनी सहलीला जाणे पसंत केल्याने गुरुवारी होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहाता शहरात अहिंसा स्तंभासाठी जागा निश्चित करणे तसेच शहरातील विविध रस्ते,चौक, नगरपरिषद सभागृह, प्रवेशद्वार यांना नाव देणे या विषयावरून वाद निर्माण होऊ नये तसेच शहरात शांतता राहावी व आ. विखे पाटील यांचा सभेला जाण्यासाठी दबाव येऊ नये यासाठी आम्ही सहलीला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

दरम्यान 17 डिसेंबर रोजी नगरपरिषदेत नगराध्यक्षा यांनी विशेष सर्वसाधारण सभा ठेवली होती. परंतु नगराध्यक्षा यांनी अहिंसा स्तंभ उभारण्यासाठी जागा निश्चित करणे तसेच शहरातील विविध रस्ते, चौक नगरपरिषदेचे सभागृह व प्रवेशद्वार यांना नाव देण्यासाठी नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही.

नगराध्यक्षा घेत असलेले एकेरी भूमिका नगरसेवकांना मान्य नसल्यामुळे शुक्रवारी 17 डिसेंबर रोजी ठेवण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शवली होती.

तसेच शिवसेनेच्या 2 नगरसेवक या सभेला गैरहजर राहिले, फक्त 2 नगरसेवक या सभेला उपस्थित असल्यामुळे नगराध्यक्ष यांना विशेष सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली.

दरम्यान आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याबाबत नगरसेवकांना विखेंनी सूचना केल्या. आ. विखे-पाटील यांनी सूचना करूनही विषय सर्वसाधारण सभेच्या दोन दिवस आधी भाजपचे नगरसेवक सहलीला गेल्यामुळे शहरात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office