अहमदनगर उत्तर

ओबीसी आरक्षणाशिवाय प्रथमच नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होतेय निवडणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात ऐन थंडीच्या काळात राजकीय निवडणुकांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. यातच ओबीसी आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरून राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे.(elections)

यातच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे.

दरम्यान जिल्ह्यात या तीन तालुक्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

त्यामुळे या निवडणुकीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. यातच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने कोणाला याचा फटका बसणार हे देखील पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या 12 जागांवर 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दोन्ही टप्प्यातील निवडणुकीतील मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.

त्यामुळे आज मतदान होणार असलेतरी सर्व उमेदवारांना निकालासाठी 19 जानेवारी 2022 ची वाट पाहावी लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office