अहमदनगर उत्तर

दैव बलवत्तर ! बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून शेतकरी बालंबाल बचावला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- शेतात पाणी भरत असताना शेतकऱ्यांवर बिबट्यांने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे.

दरम्यान दैव बलवत्तर म्हणून दोन शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यात वाचले. दरम्यान परिसरात सापळा बसविण्यात यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे,. याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे शेतामध्ये भिकाजी बोडखंळ व दिनकर बोंडखळ शेतीला पाणी भरत होते.

व्यंकट बोंडखळ यांना बिबट्या चाल करून जात असताना दिसला त्यांनी मोठ्याने आवाज देत बोंडखळ यांना सावध केले. मोठी डरकाळी फोडत बिबट्या अंगावर झेप घेण्याच्या स्थितीत असतानाच आपल्या जवळच्या बॅटरी चालू करत बिबट्याच्या डोळ्यावर चमकवल्या त्यामुळे बिबट्या तिथेच थबकला.

व्यंकट बोंडखळ यांनी सावध पवित्रा घेत सयराम बोंडखळ, भाऊसाहेब बोंडखळ, नितीन रांधवण, भास्कर होन त्यांना आवाज देत बोलावून घेतले. सयराम बोंडखळ यांचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी चालू करत बिबट्याच्या दिशेने फिरवला मग मात्र बिबट्याने तिथून पळ काढला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून पिंजरा लावला जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सोनेवाडी चांदेकसारे पोहेगाव परिसरात हा एकमेव बिबट्या दहशत पसरत असून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी जाणे जिकरीचे झाले आहे.

या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग पथकाने परिसरात त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office