अहमदनगर उत्तर

दैव बलवत्तर…गळ्याचा फास त्या तरुणांच्या जीवावर बेतला असता

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर शहरात पतंगाच्या माज्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आदित्य झिने हा युवक जखमी झाला आहे. गळ्याचा फास जीवावर बेतला असता परंतू केवळ दैव बलवत्तर म्हणून हातावर निभावले.

दरम्यान श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरही पंतगाच्या मांजाने एका तरुणाच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. अधिक माहिती अशी, आदित्य झिने (वय 24) हा तरूण शहरातील कॉलेज परीसरातील रेल्वे अंडर ग्राऊंड पुलाजवळच्या वसाहतीपासून शहरात मोटारसायकलने येत असताना अचानक मानेला काहीतरी रूतत असल्याचे जाणवले.

हा मांज्या लावलेली दोरा असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी हाताने दुर करण्याचा प्रयत्नात त्याच्या हाताच्या बोटाला कापले. मांज्याने त्यांच्या बोटांना जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले.

हा प्रकार आदित्य याच्या वेळीच लक्षात आला नसता तर मांज्याच्या दोराने आदित्यच्या बोटावरची जखम गळ्यास होऊन मोठा अनर्थ झाला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून गळ्यावरचे बोटावर निभावले.

दुसरी घटना राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील तरुणाच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून स्थानिक नागरिकांनी त्यास रुग्णालयात दाखल केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office