अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी किंवा इतर कारणासाठी महिलांवर होणारे छळ या गोष्टी अजूनही समाजात घडत आहेत. अशाच एका नेवासा तालुक्यातील देडगाव येथील घडलेल्या घटनेने सर्वाना हादरून सोडले आहे.
ट्रॅक्टर घेण्याकरिता आई-वडिलांकडून 4 लाख रुपये घेऊन यावे, यासाठी याठिकाणी महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासू-सासर्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शितल आवजीबाबा लोखंडे (वय 27) हल्ली रा. पाचुंदा, ता. नेवासा असे या विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या सासरी पती आवजीबाबा उर्फ संभाजी गंगाधर लोखंडे, सासरे गंगाधर यशवंत लोखंडे, सासु लक्ष्मिबाई गंगाधर लोखंडे, भाया अंबादास गंगाधर लोखंडे,जाव मिना अंबादास लोखंडे हे होते.
ते मला ३ वर्षानंतर घरामधे त्रास देवु लागले, शिवीगाळ करु लागले व मला म्हणाले की शेतीचे कामासाठी तुझे माहेराहुन एक लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन माझा शारीरिक व माणसिक छळ करू लागले. मला शिवीगाळ करुन मारहाण करुन उपाशी पोटी ठेवु लागले व मला वरील लोक म्हणाले की आम्हाला शेतीच्या कामा करिता ट्रॅक्टर घेवायचा आहे.
त्याकरिता तुझे आई वडीला कडुन 4 लाख रुपये घेवुन ये. असे म्हणुन मला दमदाटी देवुन माझा पुन्हा शारिरिक व माणसिक छळ करू लागले. त्यानंतर लग्नानतर सुमारे 3 वर्षानंतर पुन्हा शेतीचे कामा करिता ट्रॅक्टर घेणे करिता 4 लाख आणावेत या कारणावरुन पती आवजीबाबा उर्फ संभाजी गंगाधर लोखंडे,
सासरे गंगाधर यशवंत लोखंडे, लक्ष्मिबाई गंगाधर लोखंडे, अंबादास गंगाधर लोखंडे, मिना अंबादास लोखंडे सर्व रा.देडगाव ता. नेवासा यांनी मला नेहमी शिवीगाळ करुन मारहाण करुन दमदाटी देवुन वेळोवेळी उपाशी पोटी ठेवुन माझा शारिरिक व मानसिक छळ केला आहे. म्हणून फिर्याद दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved