अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका किराणा दुकानदाराने अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
संगमनेर शहरालगत गंगामाई घाट येथे एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ही घटना ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गंगामाई घाटाच्या परिसरात मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
हौशीराम विष्णू जाधव (वय ५५ रा. घुलेवाडी) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हौशीराम जाधव यांचे घुलेवाडी येथे किराणा मालाचे दुकान असल्याचे समजते.
आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र अज्ञात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास संगमनेर पोलीस करीत आहे.