Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी प्रमुख राजकीय संघर्ष हा कोल्हे आणि काळे यांच्यामध्ये दिसून येतो.
गेल्या काही दिवसांपासून आपण कोपरगावचे राजकारण बघितले तर यामध्ये आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या.
गेल्या कित्येक दिवसापासून विवेक कोल्हे हे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे दिसून येत होते. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुकीत देखील आ.आशुतोष काळे आणि कोल्हे यांच्यामध्ये लढत होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती.
परंतु माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी मात्र पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जर असे झाले तर मात्र आ. आशुतोष काळे यांचा या निवडणुकीतील मार्ग खूप सोपा आणि सुकर होणार आहे.
कोल्हे घेणार निवडणुकीतून माघार?
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत दोन वेगवेगळ्या बैठका पार पडल्या. कोल्हे कुटुंबाचा पक्ष योग्य तो सन्मान ठेवेल असा विश्वास यामध्ये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
चर्चाच्या दोन फेरी झाल्या तरी देखील मात्र कोल्हे यांचा निर्णय नेमका काय राहील? हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. येत्या दोन दिवसांमध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे या आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये फडणवीस यांनी कोल्हे यांचा पक्ष कार्याचा सकारात्मक अहवाल महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांना पाठवला.
त्यानंतर महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी कोल्हे यांची चर्चेची दुसरी फेरी झाली. या चर्चेमध्ये नेमके काय ठरले? याबाबत मात्र काहीही कळू शकलेले नाही.परंतु मिळालेल्या माहितीनुसार कोल्हे कुटुंबियांचा पक्ष योग्य तो सन्मान राखेल असे नेतृत्वाने सांगितल्याचे बोलले जात आहे.
यामध्ये कोल्हे यांना नेमके कोणते आश्वासन मिळाले किंवा भविष्यात पक्षाची कोणती जबाबदारी त्यांच्यावर राहील हे मात्र अजून कळू शकलेले नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येत्या दोन दिवसांमध्ये स्नेहलता कोल्हे या राजकीय पेचाबाबत त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. तेव्हाच त्यांच्या या निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट होईल हे मात्र निश्चित.जर कोल्हे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली तर मात्र आशुतोष काळे यांचा मार्ग सुकर होणार आहे.