मयुरेश्वर गणपती मंदिर परिसरातच चोरीच्या घटना वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. तसेच चोरी, लूटमार, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मयुरेश्वर गणपती मंदिर परिसरात गेल्या आठवड्यात रस्ता लुटीच्या अनेक घटना घडलेल्या.

असे प्रकार वारंवार होत असल्याने शिर्डी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात कोपरगाव वरून कंटेनर मालवाहतूक करणार्‍या दोन गाड्यांना मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी अडवत त्यांना मारहाण केली.

Advertisement

त्यांच्याजवळ असलेले रोख रक्कम घेऊन पोबारा केला. पोहेगाव मयुरेश्वर मंदिर परिसरात रोहमारे वस्ती लागत रस्ता खचला असून या रस्ताचा फायदा हे चोर घेत असतात.

शिर्डी पोलीस स्टेशनने या परिसरात गस्त वाढवावी व या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Advertisement