अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- अहमदनगर : कोपरगाव, केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण आणि आत्मनिर्भर भारत साठी केंद्र सरकारने घेतलेलया निर्णयामुळे शेअर बाजार (BSE SENSEX) वधारला असून त्याचा फायदा कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील मुलांना होत आहे असे अलीकडील काही घटनेवरून दिसून आले आहे(share Market).(सेन्सेक्स) (BSE SENSEX)वधारत चालला आहे.
याचा फायदा अनेक छोट्या -मोठ्या गुंतवणूकदारांना होत आहे.
आतापर्यंत शेअर बाजारातील गणिते ज्याला कळत होती त्यालाच त्याचा फायदा होत असायचा असे मानले जायचे .
परंतु माहितीतंत्रज्ञाच्या युगात कोपरगावातील मुले मागे राहिलेले नाहीत असे अलीकडील काही घटनेवरून दिसून आले आहे.
कोरोनाच्या काळात अनेकांचे जॉब गेल्याने त्यांनी इतर उत्पनाचे श्रोत शोधले. शेअर मार्केट मध्ये चांगला अभ्यास करून गुंतवणूक केले तर कमी गुंतवणुकीतून अधिक फायदा मिळतो असे कोपरगावातील काही जाणकारांचे मत आहे.
जाणकारांच्या प्रतिक्रिया
१) भविष्यातील गरज आणि सरकारचे धोरण यांचा योग्य अभ्यास केला की ,कोणते शेअर नफ्यात राहतील कोणत्या शेअरवर जास्त परतावा मिळू शकतो याचा
अंदाज येतो. बाजारभावाचा अभ्यास असेल तर तोटा होण्याचा संभव कमी असतो.
– इंजि . तुशार गोरे कोपरगाव.
२) व्यवसाय सुरू असून, उत्पन्नाचे दुसरे एखादे साधन असावे, बँकेच्या व्याजदरात कमी झाल्याने तिथे गुंतवणूक करण्यापेक्षा बाजारात काही काळाने काहोईना नफा मिळेल, या आशेने तिकडे वळलो आहे. फावल्या वेळेत शेअर बाजारात खरेदी- विक्री करण्यास प्राधान्य देतो.
– महेश भोर, व्यावसायिक.