कोपरगाव मतदार संघासह राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होवू दे, असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी विठूरायाला घातले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त काल बुधवारी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बेट भागातील श्री काशी विश्वेश्वर, श्री शुक्लेश्वर व परमपूज्य राष्ट्रसंत श्री जनार्दन
स्वामी महाराज तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होवून विठुरायाची महाआरती केली. त्यावेळी विठुरायाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली. तसेच संत रमेशगिरी महाराज यांचे आशिर्वाद घेतले.
कोपरगाव मतदार संघात पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता काहीशा वाढल्या होत्या. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून पिकांना जीवदान मिळाले असले, तरी अजूनही पावसाने सरासरी ओलांडलेली नाही.
आ. काळेंचे विठूरायाला साकडे
त्यामुळे बळीराजाच्या चिंता मिटलेल्या नाहीत. त्यामुळे पांडुरंगा भरपूर पाऊस पडू दे व बळीराजा बरोबर सर्व मायबाप जनता सुखी होवू दे, असे साकडे आ. काळे यांनी भगवान पांडुरंगा चरणी घातले.
यावेळी कोपरगाव शहरात नरसिंह प्रतिष्ठाण ट्रस्ट व परमवीर ग्रुप यांच्या वतीने आयोजित आषाढी एकादशी उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री विठ्ठलाची आरती केली व भाविकांना फराळ वाटण्याची सेवा देखील केली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.