Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
या सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, या निवडणुकीमध्ये आशुतोष काळे यांना जेवढा लीड तेवढा जास्त निधी कोपरगावकरांना दिला जाईल व काळे यांना चांगली जबाबदारी सुद्धा दिली जाईल अशा प्रकारचा माझा वादा आहे अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
आशुतोष काळे यांना जेवढे लीड तेवढा जास्त निधी- कोपरगावकरांना अजित पवार यांचा वादा
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,मागील निवडणुकीत आशुतोष काळे यांना साडेआठशेचे लीड मिळाले. परंतु या वेळेस कोल्हेंनी पक्षाच्या सांगण्यावरून थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे धन्यवाद.
आता आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी नागरिकांची असून जेवढे लीड जास्त तेवढा जास्त निधी कोपरगावला दिला जाईल व इतकेच नाही तर आशुतोष काळे यांना चांगली जबाबदारी सुद्धा दिली जाईल हा माझा वादा आहे असे देखील त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, उच्चशिक्षित जनतेसाठी काम करणारा आमदार कोपरगावच्या जनतेने मागील निवडणुकीत दिला. विधिमंडळात देखील आशुतोष काळे यांनी धडाडीने काम केले आहे.
त्यांनी कधीही स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही. ते फक्त मागतात ते मतदारसंघाच्या विकासासाठी. त्यांचे सर्व हट्ट देखील मी पूर्ण केले आहेत असे देखील त्यांनी म्हटले. आता कोपरगावकरांनी त्यांना 85 हजार मतांचे लीड द्यावे व त्याचे पुढचे सर्व हट्ट मी पूर्ण करतो असे देखील त्यांनी म्हटले.
मायचा लाल योजना बंद करू शकत नाही
लाडकी बहिण योजना बंद होईल असा कांगावा विरोधक करत असून त्यांच्या काळात त्यांनी सव्वा रुपया दक्षिणा देखील कोणाला दिली नाही. लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे महिला समाधानी आहेत.
त्यामुळे ही योजना सुरू ठेवायची असेल तर महायुती सरकारला पुन्हा निवडून द्या. पुढचे पाच वर्षे ही योजना कोणी मायचा लाल बंद करू शकणार नाही असे देखील अजित पवार यांनी म्हटले.