अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगरच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाच वेळी नेवासा, नेवासाफाटा, सलबतपूर व घोडेगाव येथील परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापा टाकून बनावट दारू जप्त एली आहे.
तसेच काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
नेवासा फाटा येथील परवानाधारक रवींद्र कत्तेवार दारू दुकानात पथकाने छापा टाकला तेव्हा आरोपी प्रशांत सोडा, लिंगया प्रशांत गौड व नरसिमल्लू पूठ्ठा (सर्व रा.आंध्र प्रदेश,ह.मु.नेवासा फाटा) हे देशी दारूच्या सीलबद बाटल्यांमधून काही प्रमाणात दारू काढून ती दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरत होते.
दारू काढलेल्या बाटल्यामध्ये पाणी भरून पुन्हा चिकट टेप लावून पहिल्यासारखेच सील करत होते. या दुकानातून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसऱ्या पथकाने सलाबतपूर येथील देशी दारूच्या दुकानात छापा टाकला तेव्हा तेथेही असाच प्रकार सुरू होता.
दुकानाशेजारीच असलेल्या एका खोलीत प्रशांत राधेशाम गौड हा बाटल्यांमध्ये पाणी भरून भेसळयुक्त दारू तयार करत होते.
त्यानंतर घोडगाव येथील एका देशी दारू दुकानामध्येही पथकाला असाच प्रकार आढळून आला.नेवासा येथील दारू दुकानामध्येही छापा टाकून काही संशयितांना अटक केली.