अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- बेलापूर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत लैंगिक शोषण केले.
याप्रकरणी एका जणांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला करून आरोपीस अटक करण्यात आली.
बेलापूर ऐनतपूर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजूर शेख याने आठ दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेले होते.
त्या बाबत बेलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
ही मुलगी देहरे येथे असल्याचे समजताच सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पाटील, हवालदार अतुल लोटके,
गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, निखील तमनर, पोपट भोईटे, हरीष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेऊन ताब्यात घेतले.