अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला होता. जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
मात्र योग्य उपचार न मिळाल्याने व या ठिकाणी शस्त्रकिया करण्याची सुविधाही नसल्यामुळे जखमींनी खासगी रुग्णालयाचा आसरा घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मोहटा देवी मंदिर व डॉ. सदावर्ते भागात रविवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्याचा थरार पहायला मिळाला होता.
या बिबट्याच्या हल्ल्यात एका वनकर्मचार्यासह सात जण जखमी झाले होते. त्यांच्यावर श्रीरामपुरात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या सर्व रुग्णांना नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी या जखमींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले नाहीत. त्यातील एका रुग्णावर शस्त्रक्रिया करायची होती.
मात्र शस्त्रक्रियेची सुविधा नसल्यामुळे राहुल छल्लारे या शिक्षक यांनी खासगी रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया करुन घेतली. या जखमींना रात्री गोळ्यांचा एक डोस दिल्यानंतर कोणीही फिरकले नाही.
दोन रुग्णांचा रक्तस्त्राव होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले. हे जिल्हा शासकीय रुग्णालय बेवारस असून याठिकाणी रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लुारे यांनी सांगितले.