अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेत आहेत.
या उपचारांनी काळे लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेसाठी पुन्हा सक्रीय व्हावेत, यासाठी कोपरगाव शहरासह विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते देवदेवतांना साकडे घालत आहेत.
कोपरगाव शहरात राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील ग्रामदैवत मुंबादेवीची महाआरती केली. महादेव मंदिरात आरती करून प्रार्थना करण्यात आली.
उक्कडगाव येथील श्रीरेणुकामातेची कार्यकर्त्यांनी महाआरती करून आमदार काळे यांची कोरोना बाधेतून मुक्तता होऊन त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी प्रार्थना केली.
यावेळी बबनराव गाढे, नानासाहेब निकम, अप्पासाहेब निकम, दीपक चव्हाण, हिरामण गुंजाळ, संदीप निकम, सोपान शिंदे, दादासाहेब त्रिभुवन, रवींद्र निकम, शिवाजी निकम, नवनाथ निकम आदी उपस्थित होते.