अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवार रोजी 288 वाहनांमधून 53 हजार 336 गोण्या विक्रीसाठी आल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे काल बुधवारी कांद्याच्या आवकेत सोमवारच्या तुलनेत 11 हजार 657 गोण्यांनी वाढ झाली आहे. तसेच मालाला मिळालेला भाव जास्तीत जास्त 4 हजारांपर्यंत निघाला. सोमवारच्या तुलनेत तो 200 रुपयांनी अधिक आहे.
जाणून घेऊया भाव
उन्हाळी कांद्याच्या मोठ्या मालाला 3400 ते 3500 रुपये भाव मिळाला.
मध्यम मोठ्या मालाला 3000 ते 3100 रुपये मध्य मालाला 2100 ते 2500 रुपये
गोल्टी कांद्याला 1900 ते 2100 रुपये
गोल्टा कांद्याला 1900 ते 2500 रुपये
जोड कांद्याला 500 ते 600 रुपये
एक-दोन वक्कलांना 3500 ते 4000 रुपये
नवीन मालाला 500 ते 3000 रुपये इतका भाव मिळाला.