अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर : कोरोनाने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. या लढ्यासाठी सर्वच थरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही कोरोनाच्या लढ्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची मदत जाहीर केली आहे.
यासंबंधीचे पत्र नुकतेच खासदार लोखंडे यांनी केंद्रीय सांख्यिकी विभागाला दिले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव टाळण्यासाठी व उपचार करण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. तसेच लॉकडाऊनमुळे गरिबांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज भासणार आहे
. त्यामुळे खासदार लोखंडे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रूपये वर्ग करण्याचे पत्र केंद्रीय सांख्यिकी विभागाला दिले आहे. हा निधी तात्काळ वर्ग करण्यात येणार असून खासदार सदाशिव लोखंडे यांनी सर्व खासदारांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. खा. लोखंडे यांनी सर्व नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
तसेच प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेण्याचीही विनंती लोखंडे यांनी केली आहे. सरकार आपल्या पद्धतीने सर्व ती खबरदारी घेत आहेत, मात्र नागरीकांनीही गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com