अहमदनगर उत्तर

महावितरणच्या विजेने पेटवला शेतकऱ्याचा चार एकर ऊस…या ठिकाणी घडली घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- शेतात विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन उसाला आग लागली. या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथे घडली आहे.

उषाबाई करडे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, करडे यांच्या शेतात विजेच्या तारेच्या शॉर्टसर्किटने आग लागली.

दरम्यान आग बघितल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. या दुर्दैव घटनेत शेतकर्‍याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाली आहे.

करोना सारख्या संकटामुळे शेतकर्‍यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत. त्यात महावितरण कंपनी शेतकर्‍यांना वारंवार वेगवेगळ्या पध्दतीने शॉक देत आहे.

आत्तापर्यंत अनेक ठिकाणी ऊस जळाल्याच्या घटना घडल्या. त्या सर्व महावितरणच्या गलथान कारभारामुळेच घडल्याचे निदर्शनास आले आहे.

वारी येथील उषाबाई करडे यांनी उसासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहेे.ऊस जळाल्यामुळे कर्ज फेडण्याबरोबरच त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. झालेल्या पंचनाम्याप्रमाणे महावितरण कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी करडे यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office