अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोपरगावहून अहमदनगर शहराकडे येणार्या दोघांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख 50 हजार रूपयांची रोख रक्कम लुटली.
याप्रकरणी राहुल संतोष कदम (रा. टीव्ही सेंटर, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चार लुटारूंविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटना नागापूर एमआयडीसी परिसरातील साईबनजवळ ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी रात्री त्यांचे साथीदार कृष्णा गोरे यांच्यासह पिकअप वाहनातून कोपरगावहून अहमदनगर शहराकडे येत होते.
रात्री पावणे बाराच्या सुमारास अहमदनगर-मनमाड महामार्गावरील विळद बायपासच्यापुढे साईबनजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कदम व गोरे यांना अडविले.
लुटारूंनी त्यांच्याकडील हत्याचाराचा धाक दाखवून पिकअपमधील खोक्यात ठेवलेली दीड लाख रूपयांची रक्कम काढून घेतली.
कदम यांच्या डोक्यात जेवणाचा डब्बा मारल्याने ते जखमी झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.