अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला.
या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार ऋषीकेश शेटे याला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याच्यासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे.
आरोपी शेटे हा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंबंधीचे एक छायाचित्रही व्हायरल होत आहे.
सोशल मीडियातील या पोस्टमध्ये या संबंधांचा दावा करीत म्हटले आहे की, ‘आठवड्यापूर्वी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राजीव राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
यातील मुख्य आरोपी ऋषीकेश शेटे हा फडणवीसांचा निकटवर्तीय आहे. गडाख पिता-पुत्रांना जीवे मारण्याची एक ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे.
पोलीसांनी यांचा सखोल तपास करावा.’ यासोबत सोबत एक छायाचित्रही शेअर करण्यात येत आहे. त्यामध्ये शेटे याने फडणवीस यांच्यासोबतचा फोटा सोशल मीडियात शेअर करून त्याखाली ‘हक्काचा माणूस देवेंद्रजी’ असे लिहिल्याचे दिसत आहे. याची खातरजमा झालेली नसली तरी ही पोस्ट नेवासा तालुक्यात व्हायरल होत आहे.