Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Ahmednagar Politics : आमदार गडाख साहेब आरोपांऐवजी समोरासमोर चर्चा करा !

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष देवीदास साळुंखे, आदिनाथ पटारे, कामगार आघाडीचे विवेक नन्नवरे आदी उपस्थित होते.

Ahmednagar Politics :नेवासा : आमच्यावर चुकीचे आरोप करण्याऐवजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा शहरातील गणपती चौकात समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले. नेवासा येथील भाजप कार्यालयात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष देवीदास साळुंखे, आदिनाथ पटारे, कामगार आघाडीचे विवेक नन्नवरे आदी उपस्थित होते.

मुरकुटे म्हणाले, आमदार असताना तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्टडी क्लबसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

मात्र, सध्याचे आमदार शंकरराव गडाख सांगतात की, विद्यार्थ्यांसाठी असलेला हा स्टडी क्लब माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे बंद करण्याचा घाट घालत आहेत. हे चुकीचे आहे. तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा कुटील डाव गडाख खेळत आहेत.

सूत गिरणीची जागा बळकाविण्याचा प्रयत्न कोणी केला? मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे उद्घाटन तेच करत आहेत. उलट आमच्यावरच ते आरोप करीत आहेत, अशी टीका मुरकुटे यांनी गडाखांवर केली.