Ahmednagar News: आपल्याला माहित आहे की,नुकतेच महाराष्ट्रातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर शहराचे नामांतरण करण्यात आले. अनुक्रमे बघितले तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि आता सध्या अहमदनगर शहराचे अहिल्यानगर अशाप्रकारे नामांतर प्रक्रिया पार पडली
असून अगदी त्याच धर्तीवर आता अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाचे नामांतरण करून ते ज्ञानेश्वर नगर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नेवाशाचे नामांतर ज्ञानेश्वरनगर जर केले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी दिला आहे.
इतकेच नाही तर याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व राज्यपालांना या मागणीच्या निवेदनाच्या प्रती देखील दिल्या आहेत.
नेवासाचे नामांतर ज्ञानेश्वरनगर करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार
नेवाशाचे नामांतर ज्ञानेश्वरनगर न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी दिला. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आदींनी या बाबत निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.
संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे पैस खांबा टेकून ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. ही ज्ञानेश्वरी सच्चिदानंद महाराज यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे नेवासा शहराचे नामांतरण होणे गरजेचे आहे.
राज्यातील औरंगाबादचे संभाजीनगर आता अहमदनगरचे अहिल्यानगर झालेले आहेत. आता नेवासे शहराचेही ज्ञानेश्वरनगर असे नामांतरण होणे गरजेचे आहे. नेवाशाचे ज्ञानेश्वरनगर नामांतरण व्हावे, अशी वारकरी संप्रदायाबरोबरच नागरिकांची मागणी आहे.
याबाबत अनेकांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला आहे. मात्र त्याकडे सरकारने कानाडोळा केलेला आहे. नेवाशाचे ज्ञानेश्वरनगर नामांतरण करण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा करणसिंह घुले यांनी निवेदनातून दिला आहे.