Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता जवळपास महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये जवळपास प्रत्येक पक्षाच्या संदर्भात महत्त्वाचे असलेले जागावाटप जवळपास निश्चित समजले जात आहे. परंतु तरीदेखील राज्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांच्या बाबतीत अजून देखील तिढा असल्याचे दिसून येत आहे.
अशा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळे देखील पक्षांपुढे राजकीय पेच निर्माण झालेला आहे. अशीच काहीशी परिस्थिती ही अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत दिसून येत आहे.
सध्या या मतदारसंघातून शंकरराव गडाख हे आमदार असून ठाकरे गटाकडून त्यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात असताना मात्र त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार देणार की शिंदे सेना? याबाबत मात्र पेच कायम असल्याचे दिसून येत आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी भाजपने कंबर कसली असून नेवासा विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी सायंकाळी भेट घेऊन नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घेण्याची मागणी केल्याची माहिती समोर आलेली आहे.
याउलट ही जागा शिंदे सेनेकडे घ्यावी असा देखील आग्रह दिसून येत असल्याने नेमके आता नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीच्या माध्यमातून शिंदेंकडे जाते की भाजपाकडे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे जाणार की शिंदे सेनेकडे?
अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुतीतील भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे.
ही जागा भाजपकडे घ्यावी असा भाजपच्या माध्यमातून जोर लावण्यात येत आहे व त्यामुळे या मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व ही जागा भाजपकडे घेण्याची आग्रही मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच नेवासा मतदारसंघाची जागा शिंदे सेनेकडे घ्यावी असा देखील काही जण आग्रह करताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपला जाईल की शिंदे सेनेला? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
या जागेसाठी महायुतीत दोन दिवसापासून जोरदार रस्सीखेच
नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत गेल्या दोन दिवसापासून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा भाजपकडून शिंदे सेनेसाठी मागून घेतली होती. परंतु परिस्थिती बदलल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रभाकर शिंदे यांचे नाव पुढे आणले.
भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठल लंघे हे इच्छुक आहेत. हे दोघेही सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून असून दोघांपैकी आता कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे.
परंतु नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा सेनेला देण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे लंघे आणि मुरकुटे यांनी मात्र एक पाऊल मागे घेतले असून आमच्यापैकी कोणाला जरी उमेदवारी दिली तरी हे जागा भाजपकडे घ्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी मुंबईमध्ये या दोघांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केल्याची माहिती देखील मिळाली आहे.
या झालेल्या चर्चेदरम्यान नेवासा मतदारसंघ भाजपचा आहे आणि भाजपकडेच राहील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नेवासा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जातो की शिंदे सेनेकडे? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.