Ahilyanagar News: राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीचा फिवर चढायला लागला असून राजकीय वातावरण तापायला लागले आहे. प्रत्येक पक्षांकडून या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू असून बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षांना बंडखोरीचा देखील सामना करावा लागू शकणार आहे.
अशाच पद्धतीचे राजकीय वातावरण आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांना मात्र आयकर विभागाच्या माध्यमातून झटका देण्यात आला असून त्यांच्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे व यामध्ये कारखान्याला एक 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शंकराव गडाख यांच्या कारखान्याला 137 कोटी रुपये भरण्याचे
आयकर विभागाचे आदेशयाबाबत सविस्तर वृत्त असे की, विधानसभा निवडणुकीच्या धामधूमी मध्ये मात्र शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली व यामुळे आता एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे.
आयकर विभागाच्या या नोटीसीमध्ये गडाखांच्या कारखान्याला 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांच्या ताब्यात असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाची नोटीस मिळाल्यामुळे आता यातून राजकारण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गडाख मागणार उच्च न्यायालयात दाद
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुळा सहकारी साखर कारखाना असून या कारखान्याला नोटीस आल्यामुळे आता यामागे काहीतरी राजकारण होत असल्याचा आरोप शंकरराव गडाख यांनी केलेला आहे. याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की,या विरोधात आता उच्च न्यायालयात मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अगोदर देखील कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. शंकरराव गडाख उद्या या नोटीस विरोधात कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या मेळावा घेणार असल्याचे देखील माहिती समोर आली आहे.