नेवासा

अतिक्रमण धारकांना प्रशासनाचा ‘दे धक्का’…कारवाईने व्यावसायिकांची धावाधाव

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्रीरामपूर-नेवासा फाटा राज्यमार्गवरील अतिक्रमणे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे.

दरम्यान प्रशासनाच्या थेट कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिक माहिती अशी, तालुक्यातील बाभळेश्वर ते नेवासा फाटा या राज्य मार्ग 44 वरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे.

यासाठी रस्त्याच्या मध्यापासून 50 फूट रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांनी अतिक्रमणे केले आहे.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे. दम्यान गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर-नेवासे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

राज्यमार्गावरील बेसुमार वाहतुकीमुळे या राज्यमार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने राज्यमार्गाच्या दुरुस्तीची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.

अखेर या कामाला सुरुवात देखील झाली. ,मात्र अतिक्रमणाचा विळखा पाहता प्रशासनाने संबंधित अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत असे कळविले.

जे अतिक्रमण काढणार नाहीत, त्यांचे सरसकट अतिक्रमणे काढली जातील असा इशारा देण्यात आला होता. दरम्यान या कारवाईमुळे राज्य मार्गालगतच्या व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून काही व्यवसायिकांचे व्यवसाय थेट संपुष्टात येणार आहेत.

सर्वांना सारख्या न्यायाने अतिक्रमणे हटवून राज्यमार्गाचा कोंडलेला श्वास मोकळा करावा. आतिक्रमण काढताना अधिकार्‍यांनी दुजाभाव करू नये. अशी मागणी स्थानिक करू लागले आहे.

Ahmednagarlive24 Office