कांदा, टोमॅटोला विक्रमी भाव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर | येथील बाजार समितीमध्ये कांदा आणि टोमॅटोला विक्रमी भाव मिळाल्याने मोठी आवक सुरू आहे. रविवारी ८६८६ क्विंटल आवक झाल्याची माहिती सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

लिलावात कांद्याला सर्वाधिक प्रतिक्विंटल १८५१ रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला १५०१ ते १८५१, दोन नंबरला ११०० ते १५०० व तीन नंबर कांद्याला ५०० ते १००० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्यास ३०० पासून ७०० रुपये व्यापाऱ्यांनी मोजले.

नियमित शेतीमालात समावेश असलेल्या टोमॅटोलादेखील चांगला बाजार मिळाल्याने शेतकऱ्यात समाधान आहे. टोमॅटोची ४०९४० क्रेटची आवक झाली. ६०० ते ६५० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24