अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सायंकाळी आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) यांचा मृतदेह असल्याची माहिती मूकबधीर शाळेच्या शिक्षकांनी अमोल चंद्रकांत जपे यांना दिली.
त्यांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
त्यांनतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले.
यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन शेवाळे करत आहे.