अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- शेकडो मैल दूर प्रवास करूनही शिर्डीत आल्यानंतर साईभक्तांना साईदर्शनासाठी प्रशासनाच्या कार्य विरोधात ठिय्या आंदोलन करून दर्शनासाठी विनवणी करावी लागते ही तर मोठी खेदजनक बाब आहेत.
एकीकडे शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुललेली असताना दर्शन रांगा मात्र रिकाम्याच असतात. ऑनलाईन पास संकल्पना करोना महामारी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने योग्य असली तरी मात्र ऑनलाईन पास भक्तांसाठी सुविधा नसून अडचण निर्माण झाल्याचे चित्र शिर्डीत पाहायला मिळाले.
दररोज भाविकांची वाढणारी संख्या विचारात घेता ऑनलाइन पासेसच्या संख्येची मर्यादा सुद्धा वाढवणे गरजेचे आहे. परंतु तसे झाले नाही परिणामी ऑनलाइन पासेसच्या प्रिंट घेण्यासाठी भक्तांना
दर्शनापूर्वी शिर्डीत मोठी भटकंती करावी लागत असून प्रिंट काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहे. साईबाबा मंदिर प्रशासनाने भाविकांचे प्रश्न,
समस्या व सूचना समजून घेऊन त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. परंतु भक्तांच्या दानावर चालणार्या साईसंस्थान याचा विसर पडला आहे का ?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.