अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सन २०१९ -२० च्या खरीप हंगामातील कापुस व तूर या पिकाच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
सन २०१९ -२० मधील खरीप हंगामातील कापूस व तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु वेळेवर पाऊस पडला नाही.
तसेच खराब हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठया प्रमाणात खर्च करून उभी केलेली हातातोंडाशी आलेली दोन्हीही पिके वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले.
तत्कालीन सरकारच्या माध्यमातून दोन्ही पिकांचा भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत विमा उतरवण्यात आला होता, त्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची मागणी कोल्हे यांनी केली.
सध्या जगासह देशभरात कोरोनाच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्रातही या आजाराने थैमान घातले. मोठ्या कालावधीसाठी लाॅकडाऊन करण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले.
विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत त्यांना सन २०१९-२० च्या खरीप हंगामातील कापूस व तूर पिकाच्या विम्याची रक्कम मिळाल्यास दिलासा मिळेल.
त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीनीकडून तातडीने विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीही कोल्हे यांनी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com