अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-लग्नासाठी मुलगी दाखवून मुलाच्या कुटूंबियांकडून सव्वा लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यात घडला होता.(Ahmednagar Crime)
याबाबत जालना जिल्ह्यातील विवाहेच्छुक युवकाच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत विजय देविदास पवार (वय २५) धंदा- मजुरी रा. लोधी मुहल्ला जालना याने फिर्याद दिली होती. यात असे म्हंटले कि, मी जालना शहरात आई, भाऊ, भावजयी आदींसह एकत्र कुटूंबात राहत असून शहरात आरओ फिल्टरचे मजुरीने काम करतो.
माझी बहिण मनिषा विष्णु ब्राम्हणे ही तीर्थपुरी ता. घनसांगवी जि. जालना येथे राहतात. माझी बहिण मनिषा हिने तिच्या गावातील परिचित असलेल्या ओमकार भानुदास कासार याला माझ्या लग्नासाठी मुलगी पाहण्यास सांगितले होते. कासार याने मुलगी दाखवतो. तिच्या आई-वडिलांकडे पैसे नाहीत.
लग्नासाठी १.२० लाख रुपये द्यावे लागतील. नेवासे येथे मुलगी दाखवतो, असे म्हणून नवरदेवासह बहिण व सासुला नेवासे येथील बसस्थानकात आणले. मुलीचे नातेवाईक दाखवतो ठरलेले पैसे दे, असे कासार म्हणू लागला.
कासारने महिलेला फोन करुन बोलवले. तिने नवरीचे नाव कोमल राजू साठे सांगितले, तर मावशीचे नाव संगिता वसंत जाधव, रा. पैठण व दुसरी महिला सुमन रमेश वाघमारे, रा. हडपसर, पुणे असे सांगून या महिला पैसे मागू लागल्या.
नवरदेव मुलगा विजय याने मुलीला विचारले असता मला आई – वडील नाहीत असे तिने सांगितले. कासारने मुलीचे आई – वडील गरीब असल्याचे सांगितल्यामुळे नवरदेवाला हा फसवणुकीचा डाव लक्षात आला.
त्याने निरीक्षक पोवार यांना माहिती दिली. पोलिसांनी कोमल साठे, संगिता जाधव, सुमन वाघमारे, ओमकार कासार,रावसाहेब वानखेडे यांना अटक केली.