अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय दुधाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय दुधाडे दुधाडे यांच्याकडे तपासासाठी असलेल्या अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी एका तक्रारदाराला ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीअंती दहा हजार रुपये श्री. दुधाडे यांनी आज दि.२७ रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वीकारले.त्याचवेळी नाशिकच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
नाशिक अँटी करप्शन विभागाचे प्रमुख पोलीस अधिक्षक श्रसुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केल्याचे समजते.सध्या श्री. दुधाडे यांची नाशिकचा पथकाकडून चौकशी चालू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ते करीत आहेत.