अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने गुरुवारी शिर्डी येथे बेवारस बालकांचा शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेत शिर्डी परिसरात अकरा बालके बेवारस आढळून आली होती.
या बालकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन ही बालके पुन्हा त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. तसेच पालकांनी यापुढे या बालकाची काळजी घेणे चुकीची कामे करण्यास प्रवृत्त न करणे व पुढील उपयोजना बाबत पोलीस निरीक्षक भीमराव नांदुरकर यांनी समुपदेशन केले.
शिर्डीत बाहेरून आलेल्या भटक्या कुुुटुंबातील अनेक बालकांना त्यांचे कुटुंबीय भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त करत असतात, त्यामुळे या मुलांचे भवितव्य अंधारात असते.
अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा एकदा शिक्षणाची गोडी लागावी म्हणून त्यांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.
या मोहिमेत मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक भीमराव नदृकर, पो हे कॅ सोमनाथ कांबळे , मपो हेकॉ. अनिता पवार, मपोकॉ आरती काळे,मपोकॉ रुपाली लोहळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.