अहमदनगर उत्तर

भंडारदरा परिसरात होणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  2021 वर्ष संपण्यासाठी अवघा काहीसे दिवस शैलक आहे. तसेच नवीन वर्षाच्या तयारीसाठी प्लॅन देखील तयार होऊ लागले आहे.नवं वर्षाचे स्वागत धुमधुडक्यात करण्यासाठी स्पॉट निश्चित केले जात असून यामध्ये भंडारदरा हे एक उत्तम ठिकाण मानले जाते.(Bhandardara area)

मात्र यंदाच्या वर्षी या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नवं वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा येथे होणार्‍या संभाव्य गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजूर पोलीस व वनविभागाच्यावतीने भंडारदरा येथे नुकतीच बैठक संपन्न झाली असून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री पर्यटकांवर राजूर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे महत्त्वाचे निसर्ग पर्यटन स्थळ असून नविन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा येथे मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी होत असते. परंतु कोविडच्या कालावधीत भंडारदरा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे दोन वर्ष भंडारदर्‍यात पर्यटकांची गर्दी झाली नव्हती.

पंरतु यावर्षी मात्र कोविडचे सर्व नियम पाळून भंडारदरा पर्यटनास परवानगी देण्यात आल्यामुळे भंडारदर्‍याला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या गर्दीवर अंकुश मिळविण्यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.

या गोष्टींची काळजी घ्या –

टेंट धारकांनी तंबुमध्ये वास्तव्यास येणार्‍या पर्यटकांची नोंद घेणे

पर्यटकांचे आय डी प्रुफ, मोबाईल नंबर, वाहन नंबर नोंदवहीत नोंदून घेणे

टेंट साईडवर रात्री नऊ वाजेनंतर म्युझिक वाजविण्यास बंदी आहे

भंडारदरा पर्यटनास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office