अहमदनगर उत्तर

दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केल्या तब्बल 12 दुचाकी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- अकोलेतुन चोरी गेलेल्या मोटारसायकलच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना चोरीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे.

दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले पोलीस स्टेशन मध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे तपासात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी प्रविण एकनाथ गांडाळ (वय 21, रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर) याने केला आहे.

त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार शरद रमेश गांडाळ (रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर) याचे मदतीने सदरच्या मोटार सायकल विक्री केल्याचे सांगितले.

त्यामुळे पोलिसांनी गांडाळ यास ताब्यात घेतले. त्याच्याकड चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे इतर दोन साथीदार यांचे सोबत आणखीन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले आहे.

त्यांचे इतर दोन साथीदार फरार असुन अटक आरोपी यांचे कडुन सुमारे 5 लाख रुपये किमतीच्या 12 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office