अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील कत्तलखान्यातून कत्तलीसाठी आणलेल्या १५ लहान-मोठ्या गोवंश जातीच्या जनावरांची नेवासा पोलिसांनी धडक कारवाई करत सुटका केली.
पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी,
पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांच्या नेतृत्वाखाली नेवासा पोलिसांनी गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता सलाबतपूर येथील कुरेशी मोहल्ला येथे छापा टाकला.
यावेळी कत्तल करण्यासाठी घराच्या मागे झाडाझुडपात बांधून ठेवलेल्या ९० हजार रुपये किमतीच्या लहान-मोठ्या १५ गोवंशाच्या जनावरांची सुटका केली.
पोलीस कॉन्स्टेबल किरण काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहनावाज शेख, शकूर इसाक शेख, वहीद गुलाम शेख (सर्व रा.सलाबतपूर, ता.नेवासा)
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.