Ahmednagar News : प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तालुक्यातील विविध गावातील रस्त्याच्या कामासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ३२ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीतून विविध गावातील
रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेनेचे संगमनेर तालुका प्रमुख रमेश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून शेडगाव, मालुंजे डिग्रज, कवठे मलकापूर, ४ कोटी ४३ लाख ७९ हजार रुपये, राष्ट्रीय महामार्ग गुंजाळवाडी ते निमगाव भोजापूर वर्षेवस्ती ९ कोटी १७ लाख ५२ हजार,
राष्ट्रीय महामार्ग तिरंगा चौक मालदाड रोड पिंपळे रस्ता ४ कोटी ३७ लाख ४३७ लाख ३६ हजार तसेच अशापीर बाबा चिंचोली गुरव, मालदाड, सुकेवाडी रस्ता १४ कोटी ४५ लाख २३ हजार रुपये मंजूर झाले आहे. या निधीतून या सर्व रस्त्यांचे भूमिपूजन केले जाणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी केले आहे.