संगमनेर

विधानसभा निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी भाजपच्या केंद्रीय स्तरावरून फिल्डिंग? भाजपच्या पक्ष निरीक्षकांकडून पाहणी

Published by
Ajay Patil

Ahmednagar News: गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला व याच फटक्याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसू नये याकरिता आता भाजपने मोठ्या प्रमाणावर कंबर कसल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

त्यामुळे लागोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रामध्ये दौरे होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष पुरविल्याचे दिसून येत असून यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आपल्याला करता येईल.

कारण नुकतेच या ठिकाणी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिट्यांचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या माध्यमातून गुजरातचे आमदार जगदीश मकवाना यांची नियुक्ती करण्यात आलेली असून ते सोमवारी साकोरे येथे जाऊन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले.

आपल्याला माहित आहे की, संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा आ. बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो व नेमके याच मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असल्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संगमनेर विधानसभा मतदारसंघात आ. बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.

 संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पक्ष

निरीक्षकांकडून पाहणी

संगमनेर विधानसभा मतदार संघातील बूथ कमिट्यांचा आढावा घेण्यासाठी भाजपने गुजरातचे आमदार जगदीश मखवाना यांची नियुक्ती केली. सोमवारी साकूर येथे जाऊन भाजप कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. संगमनेरची भाजपने येणारी विधानसभेची निवडणूक अतिशय गंभीरपणे घेतली असल्याचे दिसते.

मागील आठवड्यात उमेदवारांच्या इच्छुकांची माहिती घेण्यात आली. केंद्रीय पातळीवरून आलेल्या उत्तर प्रदेश खासदार अमित कुमार जैन व इतर निरीक्षकांनी संगमनेर तालुक्यातील भाजप कार्यकत्र्यांचे मतदान घेऊन काही इच्छुकांची नावे बंद लिफाफ्यातून पक्षश्रेष्ठींना पाठवले. माजी खासदार सुजय विखे यांनी मंत्री विखे संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

संगमनेरमध्ये आमदार थोरात यांच्या विरुद्ध विखे लढतील का? याबाबत उत्सुक्ता असली तरी विखे पाटील यांची यंत्रणा फारशी कार्यरत झाली नसल्याचे दिसून येत आहे. एकाच कुटुंबात दोघांना उमेदवारी भाजप देईल का, याबाबतही शंका आहे. थोरात विखे यांचा सत्तासंघर्ष जुना आहे. मात्र निवडणुकांच्या वेळी त्यांच्यात समझोता होत असल्याचे सर्वश्रुत आहे.

यावेळी मात्र डॉ. सुजय विखे यांच्या लोकसभेच्या पराभवानंतर एकमेकांविरुद्ध संघर्ष तीव्र झाला. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोपाचे बाण नेहमी सुटत आहे. संगमनेरच्या विकासात विष कालवण्याचा प्रयत्न पाटील करत असल्याचा आरोप आमदार थोरात यांच्याकडून होत आहे. तर संगमनेर विधानसभा कोणाची मक्तेदारी नाही, असा आरोप मंत्री विखे यांनी केला.

१९९९, साली आमदार बाळासाहेब थोरात पाटबंधारे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. हा धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार थोरात यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावली होती.

सोमवारी पिंपरणे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजित थोरात त आदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही पक्षांकडून प्रचार यंत्रणा सक्रियझाल्याचे दिसून येत आहे.

Ajay Patil