संगमनेर येथे मंगळसूत्र चोरणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने नगरच्या चांदणी चौकातून जेरबंद केला आहे. सचिन लक्ष्मण ताके (वय ३३, रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.
राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी (रा. श्रीरामपूर) याच्या मदतीने गुन्हा केल्याची व चोरीचे सोने विजय पोपट उदावंत (रा. रुई, ता. राहाता) याला विकल्याची कबुली त्याने दिली.
त्याने राहता येथे चोरी केल्याचेही समोर आले आहे. आरोपी ताके याच्या विरोधात श्रीरामपूर, तोफखाना, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, लोणी, राहाता, राहुरी, तसेच छत्रपती संभाजी नगर येथील जवाहरलाल पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.