संगमनेर

Sangamner Accident : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

Published by
Ahmednagarlive24 Office

Sangamner Accident : डंपरखाली सापडल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात घडली.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, विजय ऊर्फ बंटी केणेकर (वय ३२, रा. रंगारगल्ली, संगमनेर) हा आपल्या दोन मित्रासोबत दुचाकीवरून दिल्ली नाका परिसरातून जात होता.

यावेळी केणेकर याच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागून ते तिघेही खाली पडले. या अपघातामध्ये विजय केणेकर डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर बसलेले अन्य दोघे किरकोळ जखमी झाले

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदत करण्याअगोदरच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.

या अपघातामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मयत केणेकर हा तरुण शहरातील दिवेकर गॅस एजन्सीमध्ये नोकरी करत होता. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केलेला नव्हता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office