अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल येथे पहा……

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी २१ जागांसाठी मतदान झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये अशोक सहकारी साखर कारखान्यात काल एकूण ९३ टक्के मतदान झाले असून ११७७४ मतदारांपैकी १०५०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

तसेच सोसायटी मतदार संघात १०० टक्के मतदान झाले. यामध्ये रविवारी रोजी ४२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, कारखाना इतिहासात हे विक्रमी आणि शांततेत मतदान झाले आहे.

Advertisement

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -मुरकुटे गटाचे उमेदवार आघाडीवर असून, ५ गटातील सर्वसाधारण प्रवर्गातील मतमोजणी सुरू आहे.

– महिला वर्गातून मुरकुटे गटाच्या शितल गवारे आणि हिराबाई साळुंके विजयी झाल्या आहेत.

-तसेच इतर मागास मुरकुटे गटाचे अमोल कोकणे विजयी झाले आहेत.

Advertisement

-भटक्या विमुक्त जाती वर्गातून मुरकुटे गटाचे यशवंत दिनकर रणनवरे, प्रविण रामचंद्र देवकर विजयी झाले आहे.

-माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी खाते खोलले असून, ब वर्ग सोसायटीत मुरकुटे गटाचे सोपान राऊत विजयी झाले आहे.

Advertisement