अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
शिर्डी शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
या मागणीसाठी शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रीक निवडणूकीवर सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्यासाठी बैठक घेऊन प्रक्रिया सुरू केली असून याविषयावर आज अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान २१ डिसेंबरला होणाऱ्या शिर्डी नगरपंचायतच्या निवडणूकिवर बहिष्कार टाकण्यासाठी शिर्डी शहरात नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीयांची नेतेमंडळी तसेच ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
तसेच या मागणीसाठी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन नगरपरिषद करण्यासंदर्भात निकाल झाला होता.
परंतु त्यावर शासनाकडून अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. जोपर्यंत शासन शिर्डी नगरपंचायतची शिर्डी नगरपरिषद होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल करणार नाही
अशी भूमिका यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतल्या असून नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद झाल्यानंतर शिर्डी शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अधिकचा निधी मिळेल
तसेच नगरसेवक पदांच्या संख्येतही वाढ होईल, त्याचा प्रभागातील विकास साधण्यासाठी सुद्धा फायदा होईल. त्याकरिता सर्वानुमते बहिष्कार टाकून नामनिर्देशन पत्र दाखल न करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.