शिर्डी नगरपंचायत ! दोन्ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सर्वत्र ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

दरम्यान शिर्डी नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. यातच शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेले दोन्ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले.

असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी यासाठी शिर्डीतील सर्वपक्षीय नेते,

पदाधिकारी व ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. असे असतांना नगरपंचायत निवडणुकीसाठी असलेल्या 17 प्रभागापैकी फक्त 2 प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उर्वरित 15 प्रभागांंकरिता एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.

दाखल झालेल्या 2 अपक्ष उमेदवारी अर्जामध्ये माजी नगरसेवक सुरेश आरणे व त्यांची पत्नी अनिताताई आरणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर दाखल झालेले दोन्ही उमेदवारी अर्ज वैध असल्याचे जाहीर केले आहे.