शिर्डी

Shirdi News : साईभक्त श्रद्धेने शिर्डीत येऊन दान करतात; मात्र तो पैसा बाबांच्या पेटीत न जाता…

Published by
Ahmednagarlive24 Office

Shirdi News : साईभक्त श्रद्धेने शिर्डीत येऊन दान करतात; मात्र तो पैसा बाबांच्या पेटीत न जाता बनावट पावत्या देऊन अपहार करण्याचे प्रकार संस्थानमध्ये घडले आहेत. हे मनाला अस्वस्थ करणारे आहे.

असे प्रकार एकटा कर्मचारी करू शकत नाही. अजूनही मोठी साखळी असू शकते. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

डॉ. पिपाडा यांनी माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या वेळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की भक्तांची फसवणूक करून जास्त किंमतीला काळ्या बाजारात पास विकण्याचे प्रकार होणे गंभीर आहे.

जर शिर्डी संस्थानमध्ये याबाबत नावे निष्पन्न झाली असतील, तर अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल करणे गरजेचे आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी भाविक मोठ्या विश्वासाने दर्शनासाठी येत असतात.

त्यांची अशा पद्धतीने फसवणूक होणे हे शिर्डीच्या दृष्टीने तसेच आपल्या सर्वांच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. बाबांच्या नगरीत असे प्रकार घडू नयेत, यासाठी जागृत राहाणे गरजेचे आहे. वरील सर्व प्रकारांमुळे भक्तांमध्ये बदनामी होते,

म्हणून कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. या गोष्टी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत, अशी भावना डॉ. पिपाडा यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपचे माजी नगरसेवक तुषार गोंदकर, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, शिवसेनेचे सुनिल परदेशी, तुकाराम गोंदकर, अॅड. अविनाश शेजवळ, अजित पारख, दत्ता आसणे, दिगंबर कोते आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office