शिर्डी

शिर्डीत महायुतीचा उमेदवार ठरेना, आता मीच उमेदवार म्हणत खा. लोखंडेंनी थोपटले दंड ! तूप घोटाळा, दहा कोटी…सगळंच काढलं..

Published by
Ahmednagarlive24 Office

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झालेल्या असून अनेक नेते मंडळींनी प्रचाराचे काम सुरूच केले आहे. परंतु काही ठिकाणी अद्याप महायुतीचे उमेदवार दिले गेले नाहीत. त्यात शिर्डी या मतदार संघाचा देखील समावेश आहे.

शिर्डीत महायुतीकडून उमेदवार ठरला नसला तरी तेथे ठाकरे गटाकडून मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास फायनल झाले असल्याचे समजते. दरम्यान आता शिर्डीतून पुन्हा एकदा मीच महायुतीचा उमेदवार असेल असे म्हणत खा. सदाशिव लोखंडे यांनी दंड थोटपले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कामाला लागा असे सांगितले असल्याचे खा. लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी खा.लोखंडे पुढे म्हणाले, दोन्ही निवडणुकीत भरघोस मतांनी मला तुम्ही निवडून आणले आहे.

मी शेतकऱ्यांसाठी कामे केले असून २०२३ ला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणू शकलो असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्याच्या मदतीने १८२ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.

 दहा कोटी..तूप घोटाळा…दहा लाख..
यावेळी खा. लोखंडे यांनी वाकचौरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, जनतेला तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का की सेवा करणारा ते जनतेने ठरवले पाहिजे. वाकचौरेंची ३२ वर्ष प्रशासकीय सेवा झाली परंतु माझी जनतेमध्ये 40 वर्ष सेवा झालीये असे ते म्हणाले.

तसेच लोखंडे पुढे म्हणाले की, दिल्लीतील स्टिक ऑपरेशनमध्ये मी दहा कोटी रुपये नाकारले होते परंतु ‘त्यांनी’ साईबाबा संस्थानच्या घोटाळ्यात दहा लाख खाल्ले असा आरोप त्यांनी केला. तसेस आता दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा हे जनतेने ठरवावे असेही खा. लोखंडे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office