शिर्डी

Shirdi News : शिर्डी शहरात आता रात्री दहा वाजेनंतर होणार असे काही ! गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Shirdi News : शिर्डी शहरात आता रात्री दहा वाजेनंतर सर्वच दुकाने बंद राहाणार आहेत. तसे आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शहरातील छोटं मोठं कोणतंही दुकान अथवा हॉटेल खुले दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वमने यांनी सांगितले.श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या नगरीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

शिर्डी पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कंबर कसली असून एकापेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्या आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. शहरात शांतता राखण्यासाठी रात्री १० वाजेनंतर दुकाने,

हॉटेल बंद करणार असून १० वाजेनंतर उशिरापर्यंत डीजे सुरू ठेवल्यास शिर्डी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे.

शिर्डी शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून साईभक्तांसह, शहरातील महिला, शालेय विद्यार्थ्यांनींच्या सुरक्षेचा मद्दा उपस्थित करून शिर्डी गावातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढावी तसेच पोलिसांचा धाक वाढावा, या मागणीसाठी वमणे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी वमणे यांनी शिर्डी उपविभागीय कार्यालयाचा पदभार नुकताच स्वीकारला म्हणून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, साई नागरी पतसंस्थेचे चेअरमन अशोक कोते, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते.

भाजपचे उपशहराध्यक्ष रवींद्र गोंदकर, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अशोक पवार भाजपचे विकास गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वमणे म्हणाले, की शिर्डी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शिर्डी पोलिसांकडून सुरवात करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून काल शहरात बाहेरच्या पॉलिसीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्क्रुझर चारचाकी वाहनांवर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Ahmednagarlive24 Office