अहमदनगर उत्तर

शिर्डीकरांची चिंता वाढवणारी बातमी…एकाच दिवसात एवढ्या रुग्णांची भर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. यातच दरदिवशी रुग्णांची संख्या वाढते आहे.

गावपातळीवर पुन्हा एकदा गावे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यातच जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या शिर्डी येथून एक महत्वाचं माहिती समोर येत आहे.

करोना रुग्ण संख्येत जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असतानाच मंगळवार दि 18 रोजी शिर्डीमध्ये एकाच दिवसात 41 सक्रिय रुग्ण आढळून आल्याने शिर्डीकरांची डोकेदुखी व चिंता वाढली आहे.

करोनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासन हाय अलर्ट झाले असून नगरपंचायत प्रशासन देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. दरम्यान राहाता तालुका जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येच्या वाढीच्या बाबतीत सध्या अव्वल स्थानावर असल्याचे निदर्शनास येत आहे.

नागरिकांनी अजूनही करोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी स्वतःपासून करणे गरजेचे आहे. असे असताना मात्र बरेच नागरिक सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे.

नियमांचं उल्लंघन केल्याने शिर्डी शहरात मंगळवार रोजी 41 करोना बाधित रुग्ण आढळले आहे तर काल दि 18 जानेवारीपर्यंत शिर्डी शहरात एकूण सर्व मिळून 113 इतकी सक्रिय रुग्णांची नोंद शासन दप्तरी आहे.

राहाता तालुका प्रशासन आता मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे हाय अलर्ट झाले असून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनां पुन्हा एकदा प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे.

Ahmednagarlive24 Office