अहमदनगर उत्तर

धक्कादायक ! नागरी वस्तीत शिरून बिबट्याचा नागरिकांवर हल्ला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरात आज बिबट्याने भर वस्‍तीत येत चांगलीच दहशत माजवली. यावेळी सैरभैर नागरिकांवर त्‍याने हल्‍ला केला.

शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड ला आता 10:15 ते 10:30 दरम्यान झाला बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला व पुरुष जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (रविवार) सकाळी श्रद्धा हिंगे, (वय ११) नावाच्या मुलीवर हल्ला केला. यामध्ये श्रद्धाच्या हाताला जखमी केले.

यावेळी श्रद्धाचे वडील देखील तिच्यासोबत होते. त्यानंतर या बिबट्याने ऋषभ अंबादास निकाळजे या मुलाला देखील हल्ला करून जखमी केले.

त्यानंतर पुढे बिबट्याने अनेक नागरिकांना जखमी केल्यानंतर तो झाडाझुडुपांमध्ये लपून बसला. दरम्यान घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी प्रशासन देखील येथे पोहोचले असून, अप्पर पोलीस अधिक्षक डॅाक्टर दिपाली काळे,

तहसीलदार प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक, श्री सानप यांच्यासह फौजफाटा घटनास्थळावर दाखल झालेला आहे. परंतु वनविभाग मात्र अद्यापपर्यंत घटनास्थळावर आलेला नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office