श्रीरामपूर

अहमदनगर ब्रेकिंग : आगीत ऑइल कंपनी जळून खाक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 AhmednagarLive24 :- श्रीरामपूरच्या दत्तनगर एमआयडीसीमध्ये एका ऑइल पेंट कंपनीला सोमवारी दुपारी आग लागली. यामध्ये कंपनी जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भर दुपारी लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. मात्र, ऑइलमुळे आग भडकत राहिली. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

श्रीरामपूरच्या एसटी विभागीय कार्यशाळेच्या मागे ही ऑइल पेंटची कंपनी आहे. तेथे शॉर्ट सर्किट होऊन भर दुपारी आग लागली.

आगीमुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुरांचे लोट आकाशात जात होते. धुराचे लोट चार ते पाच किलोमीटरवर पसरले होते. आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनीनी सांगितले आहे.

जिवीत हानीसंबंधीची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

Ahmednagarlive24 Office