श्रीरामपूर

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यात भीषण अपघात : एक ठार, एक जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Shrirampur News :  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील कॉलेज परिसरामध्ये काल शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. यावेळी डंपर क्रमांक (एमएच १४ सीपी ७६३६) टाकळीभानकडे जात असताना

नेवासा रोड कॉलेज परिसरामध्ये वाहनांचा जॉइंड एक्सल तुटल्याने भीषण अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात सोमनाथ रंगनाथ माळी (वय (३०, रा. वांगी) हे मयत झाले आहे. तसेच डंपर चालक सुरेश सुखदेव पवार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अपघातावेळी वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु वाहनाने पलटी घेतल्याने यामध्ये किन्नर बाजुने एक व्यक्ती खाली पडला. तसेच दुसऱ्या पलटी मध्ये सदरचे वाहन त्यांच्या अंगावर पडले. तसेच जखमी वाहन चालक सुरेश सुकदेव पवार (वय २८, रा. टाकळीभान) स्टेअरिंगला पकडून असल्याने त्यांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने बाहेर काढले.

तसेच डम्पिंग ट्रॅक्टरच्या सहाय्याने खाली पडलेला मवत सोमनाथ रंगनाथ माळी (वय ३०, रा. वांगी, ता. श्रीरामपूर) यांना बाहेर घेत घटनेची माहिती शहर पोलीस ठाणे यांना कळविण्यात आले.

दरम्यान, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण टेकाळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत दोन्हीही जखमी व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून येथील साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले.

त्यानंतर मयत माळी यांच्यावर शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पो.ना. किरण टेकाळे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office