श्रीरामपूर

श्रीरामपूरमध्ये अजूनही महाविकास आघाडी व महायुतीत ‘पहले आप’ची भूमिका! इच्छुकांची उत्सुकता मात्र शिगेला

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली असून महाविकास आघाडी व महायुती या माध्यमातून जवळपास जागावाटप देखील पूर्ण झालेले आहे.

परंतु राज्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अजून देखील जागावाटप निश्चित नसल्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये इच्छुकांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. अगदी असेच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी देखीलरामपूर मधून महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मात्र कोणालाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून यामुळे कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे.

 श्रीरामपूरमध्ये अजून उमेदवार निश्चित नाही

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून पर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारी बाबत या ठिकाणी सस्पेन्स वाढत चालला आहे.

या ठिकाणी महाविकास आघाडीला वाटते की महायुती उमेदवार जाहीर केल्यानंतर आपण करू व नेमकी या उलट भूमिका महायुतीची दिसून येते. त्यामुळे पहिले आप अशी भूमिका महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येत आहे.

परंतु यामुळे इच्छुकांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. साधारणपणे 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु अजून देखील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमधून कुणीही अर्ज भरलेला नाही. महायुतीकडून सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांनी प्रयत्न केले आहेत.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून बघितले तर ही जागा काँग्रेसला जाईल हे निश्चित समजले जात आहे व या ठिकाणचे विद्यमान आमदार देखील काँग्रेसचे आहेत.

परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात होते तेव्हा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ठाकरे गटातून बाहेर निघत शिंदेसेनेत प्रवेश केला होता व तेव्हा विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द घेतला होता. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या वेळी सदाशिव लोखंडे यांचा प्रचार देखील जोरात केला.

परंतु मात्र आता विधानसभेला लोखंडे पिता-पुत्रांनी प्रयत्न सुरू केल्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांची मात्र गोची होताना दिसून येत आहे. त्यातच आता सदाशिव लोखंडे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल अशा बातम्या येऊ लागल्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांचा हिरमोड होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे असून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित होईल असे मानले जात असताना मात्र काँग्रेसच्याच ससाने गटाचे हेमंत ओगले यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ताकद लावल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या पुढे अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर जर बघितले तर आता या मतदारसंघांमध्ये पहिला उमेदवार महायुतीकडून जाहीर होतो की महाविकास आघाडीकडून हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajay Patil